करमाळा प्रतिनिधी

नुकतेच पंचायत समिती आरक्षण जाहीर झाले असून हिसरे येथे सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. या गणातून पंचायत समिती साठी शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. गौतम रोडे यांनी दिले आहे.

करमाळा तालुक्यामध्ये त्यांचा दूध व्यवसायामुळे मोठा जनसंपर्क असून त्यांचे काम चांगल्या प्रकारचे आहे व त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे. सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आपल्या भागातील पूरग्रस्त लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत केली आहे. गावोगावी वेगवेगळे अन्नधान्य किट, जीवनावश्यक वस्तू अशा वेगवेगळ्या किटचे वाटप त्यांनी केले आहे. त्यांचा करमाळा तालुक्यात चांगला जनसंपर्क बनला आहे. त्यामुळे ते हिसरे गणातून सहज निवडून येथील अशा प्रकारच्या अपेक्षा कार्यकर्त्यातून होत आहे.

छत्रपती दूध संकलन केंद्र संचलित जय हनुमान दूध उत्पादक संस्था आळजापूर यांच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीसाठी बोनस म्हणून साखर कट्टा व तेल डबा देण्यात आला. दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन डॉ. गौतम रोडे त्यांनी संस्थेच्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली व सर्व दूध उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण झाले व त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *