करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील पूरग्रस्त भागातील ६५ विद्यार्थ्यांना विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करून मदत करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुधीर मुळीक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व पूरग्रस्त विद्यार्थी उपस्थित होते.

यामध्ये विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काजल भोई हिने प्रतिनिधिक स्वरूपात सर्व पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या वतीने विवेकानंद महाविद्यालयाचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंकुश करपे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. कृष्णा कांबळे यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *