वीट जिल्हा परिषद गटातून रत्नमाला राजेंद्रसिंह राजेभोसले यांच्या नावाची चर्चा
करमाळा प्रतिनिधी
वीट जिल्हा परिषद गटातून रत्नमाला राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी निवडणूकीसाठी उभा राहावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
त्यांचे पती राजेंद्रसिंह राजेभोसले यांचा राजकीय संपर्क दांडगा आहे. मा उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते कट्टर समर्थक आहे व आ नारायण पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप व विलासराव घुमरे यांचे सहकारी त्यांचे स्नेहसंबंध आहेत.पहिले अकरा वर्षे पंचायत समिती सदस्य नंतर जिल्हा दुध संघाचे अठ्ठावीस वर्ष संचालक म्हणून काम पाहिले आहे त्यांचे पुत्र गजेंद्रसिंह राजेभोसले हे वीट ग्रामपंचायतचे उपसरपंच होते गेले पंचवीस वर्षे राजेभोसले यांच्याकडे ग्रामपंचायत ताब्यात होती तसेच दुध संघाच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकरी राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचा दांडगा संपर्क आहे आजात सत्रु म्हणून त्यांची ओळख आहे . रत्नमाला राजेभोसले या वीट परिसरात काकी म्हणून प्रसिद्ध आहेत महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच गावातील विविध सामाजिक कार्यक्रमात अग्रसेर असतात म्हणून राजेभोसले यांच्या नावाची चर्चा आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *