ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुरग्रस्थांना मदत
सोलापूर/करमाळा
ससाणे एज्युकेशन सोसायटी, संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, ससाणे नगर, हडपसर, पुणे ,श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था करमाळा, संयुक्त विद्यमाने कमलाई नगरी कार्यालयात पुरग्रस्थांना मदत करण्यात आली आहे.
सोलापूर विभागातील पूरग्रस्त भागातील गरजू लोकांसाठी मदत म्हणून दैनंदिन वापराच्या गरजेच्या वस्तू आणि किराणा सामान व इतर काही गोष्टी जमा केल्या होत्या शाळेच्या या मदती मध्ये शाळेचे चेअरमन श्री अजित ना.ससाणे सर आणि शाळेचे सर्व संचालक मंडळ, पालक, विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वस्तू स्वरूपात गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे जबाबदारी दिली होती त्यानुसार श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री जयंत रामचंद्र दळवी, उपाध्यक्ष सौ. सुनंदा प्रमोद दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य नियोजन करून पुरग्रस्थांना मदत पोहोचवली आहे. यावेळी ससाणे एज्युकेशन सोसायटी, संचलित न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष श्री अजित ना.ससाणे, उपाध्यक्ष श्री प्रितम कि.ससाणे, सचिव श्री सचिन नि.ससाणे, खजिनदार श्री नितीन ग. ससाणे, संचालक श्री निलेश ना. ससाणे, श्री सुधिर ना.ससाणे, श्री राजेंद्र पां.ससाणे, श्री गणेश शं.ससाणे, श्री प्रसाद प्र.ससाणे आदींच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागाच्या प्राचार्या सौ.श्रीया अशोक पत्तार, माध्यमिक विभागाच्या प्राचार्या सौ.भानुमती नायडू, शिक्षिका सौ. सुनंदा दळवी, सौ.ज्योती फासगे,सौ.स्वाती बधे, सौ.सिमा सातव, व इतर सेवक श्री गणेश पाटील,श्री.लक्ष्मण नेटके न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *