ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुरग्रस्थांना मदत
सोलापूर/करमाळा
ससाणे एज्युकेशन सोसायटी, संचलित न्यू इंग्लिश स्कूल,हडपसर, पुणे ,श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था करमाळा, संयुक्त विद्यमाने कमलाई नगरी साप्ताहिक कार्यालयात पुरग्रस्थांना मदत करन्यात आली आहे.
सोलापूर विभागातील पूरग्रस्त भागातील गरजू लोकांसाठी मदत म्हणून दैनंदिन वापराच्या गरजेच्या वस्तू आणि किराणा सामान व इतर काही गोष्टी जमा केल्या होत्या शाळेच्या या मदती मध्ये शाळेचे चेअरमन अजित ससाणे आणि शाळेचे सर्व संचालक मंडळ विद्यार्थी शिक्षक व शिक्षित तर कर्मचारी यांनी वस्तू स्वरूपात गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे जबाबदारी दिली होती त्यानुसार श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य नियोजन करून पुरग्रस्थांना मदत पोहोचवली आहे.यावेळी ससाणे एज्युकेशन सोसायटी, संचलित न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष अजित ससाणे, उपाध्यक्ष प्रितम ससाणे, सचिव सचिन ससाणे, खजिनदार नितीन ससाणे, संचालक निलेश ससाणे, गणेश ससाणे,सुधिर ससाणे, प्रसाद ससाणे आदींच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका श्रीया अशोक पत्तार,टिचर भानुमती नायडू, सुनंदा दळवी, ज्योती फासगे,स्वाती बदे,सिमा सावंत, गणेश पाटील,लक्ष्मण नेटके न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.
