
करमाळा प्रतिनिधी
जनशक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष गणेश भानवसे यांनी दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष भानवसे म्हणाले की, तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याचे नियोजन आम्ही केले आहे. गेले कित्येक वर्ष ग्रामीण भागातला विकास खुंटला होता उशिरा का होईना शासनाच्या लक्षात आल्यामुळे आता निवडणुका लागल्या आहेत. सामान्य शेतकरी नागरिकांचे शासकीय पातळीवरून कामे होत नव्हती. आता या निवडणुका लागल्यामुळे गटात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आल्यानंतर कामे मार्गी लागतील यामुळे अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्यातील निवडणुका लढवणार आहे. इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष गणेश भानवसे यांनी केले आहे.