करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 9 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापूर येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल रणधीर सतीश यांनी एन.सी.सी. विभागास प्रशासकीय भेट दिली. संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे नियोजन करण्यात आले होते. कर्नल रणधीर सतीश यांची महाविद्यालयास दुसरी प्रशासकीय भेट आहे. या भेटीदरम्यान त्यांनी एन.सी.सी. कॅडेटसचे निरीक्षण केले. त्यानंतर एन.सी.सी. कॅडेट्सला त्यांनी त्यांच्या करिअरच्या संधी तसेच एन.सी.सी. मुळे जीवन कसे घडते याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय पदावरून बोलताना डॉ. अनिल

साळुंखे सरांनी एन.सी.सी.च्या कॅडेट्सला शालेय जीवनाबरोबरच पुढील आयुष्यातही एन.सी.सी. चा कसा फायदा होतो याविषयी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.सी.सी. विभागाचे केअर टेकर प्रा.रामकुमार काळे यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, एन.सी.सी. विभाग प्रमुख कॅप्टन विजया गायकवाड तसेच सोलापूर येथून आलेले सुभेदार प्रदीप कदम, हवालदार समाधान धरिंगे यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.सी.सी. कॅडेट प्रतीक्षा तरंगे हिने केले तर आभार प्रदर्शन अभिषेक करकुटे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निलेश भुसारे व एन.सी.सी. कॅडेटचे सहकार्य लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *