करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संचलन करमाळया शहरात करण्यात आले होते. प्रथम शस्त्र पुजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख वक्ते सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, पंच परिवर्तन या विषयावर समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरी शिष्टाचार, स्व-बोध माहिती दिली त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून सघोष संचलन काढण्यात आले होते. तालुक्यातील सर्व स्वयंसेवक गणवेशात सहभागी झाले होते.

प्रमुख उपस्थिती दिपक आबा देशमुख, प्रमुख वक्ते मुकुंद सहस्त्रबुद्धे, जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद, तालुका संघचालक डॉ. श्रीराम परदेशी, कार्यवाह दत्तात्रय मनसुके, उत्सव प्रस्तावना व परिचय सह कार्यवाह प्रविण गायकवाड यांनी केले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *