
करमाळा प्रतिनिधी
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीच्या परिसरातील गावातील शेतकरी नागरिकांचे भरपूर नुकसान झालेले आहे. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सोशल फाउंडेशन, शिरोळ आणि श्री दत्त उद्योग समूह शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्यावतीने अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत करण्यात आली.
नऊ बॉक्स तेल, 50 बॉक्स पाणी बॉटल, चार बॉक्स वही, चार जार पाणी, आठ बॉक्स साबण, यासह तांदूळ, गहू, ज्वारी, साड्या, स्वेटर, रग, बिस्कीट पुढे सर्व मिळून टोटल 700 बॉक्स किट देण्यात आले आहे. हे सर्व किट तहसीलदार करमाळा त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, तहसील मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
