करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील आदर्श शिक्षक म्हणून नामदेवराव जगताप विद्यालय झरे येथे तीस वर्ष उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल माध्यमिक शिक्षक संघटनेचे ‌पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांना बार्शीचे लोकप्रिय आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षक संघटनेचा ‌जीवन गौरव पुरस्कार देऊन प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट काम करणाऱ्या सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या

शिक्षकांचा‌ कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. मुकुंद साळुंखे सर त्यांच्या धर्मपत्नी राणी राऊत, चिरंजीव शुभनीत यांच्यासह सहकुटुंब हा सन्मान स्वीकारला. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष‌ म्हणून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपोषण मोर्चे आंदोलन विविध मार्गाने शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले असल्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी शिक्षण निरीक्षक पुणे रावसो मिरगणे, जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुकुंद साळुंके सरांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ‌करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, सचिव नरेंद्रसिंह ठाकुर, शिवसेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष‌ संजय सोनवणे सर, जिल्हा उपाध्यक्ष ‌उत्तम हनपुडे, तालुकाध्यक्ष प्रताप बरडे, किरण किरवे तालुकाध्यक्ष टी.डी.एफ. यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे विभागातून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *