
करमाळा प्रतिनिधी
तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून सकाळी ११ च्या सुमारास पार पडली असून जयदिप पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे यांनी मक्ता घेतला आहे. दि. २२ सप्टेंबर २०२५ ते भाद्रपद वैद्य अमावस्या पर्यंत एका वर्षाचा मक्ता दिला आहे. या नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनाची महापुजा तहसीलदार शिल्पाताई सुधीर घोंगडे व सुधीर मल्लिकार्जुन घोंगडे यांच्या हस्ते घटस्थापना अष्टमी होम पुजा होणार असून उत्सव काळात मंदिर समितीकडून भक्तांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही भक्तांच्या दर्शनासाठी उड्डाण पूल स्टील रेलिंग ची रांग त्याच बरोबर गोपुरे तीन दिपमाळी यांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई तसेच माही डेकोरेशन मराठा मंदीर डोकोरेशन यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आकर्षक डिझाईन चे डेकोरेशन करण्यात येणार आहे. तसेच पारंपारिक वाद्य बॅण्ड पथक देखील सांगण्यात आले आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर यांचे आयोजन करण्यात आले आहे.

करमाळा डिवायएसपी अंजना कृष्णा, पिआय रणजित माने यांची शांतता कमिटी बैठक पार पडली.यावेळी उपस्थित श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीचे पद सिध्द तहसीलदार सौ शिल्पताई ठोकडे, अध्यक्ष चिवटे, सचिव अनिल पाटील, डॉ रोहण पाटील, सुशील राठोड, ॲड शिरिषकुमार लोणकर, राजेंद्र वाशिंबेकर, करमाळा तसेच श्री देवीचामाळ ग्रामपंचायत आजी माजी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, पुजारी, सेवेकरी मानकरी, खांदेकरी व सर्व भक्तगण उपस्थित होते.