करमाळा प्रतिनिधी

कुर्डू गावातील बेकायदेशीर मुरूम उपसा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्या फोनवरील संवादाने हे प्रकरण महाराष्ट्रभर प्रचंड गाजले असून आरोप प्रत्यारोप झाले.

या प्रकरणाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा वाचा फोडलेले जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी दबलेले प्रकरण मीडियाच्या समोर आणत दुग्धभिषेक आंदोलन केले. गेले दहा दिवस हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजत असताना आज करमाळा तालुक्यातील कंदर येथे खूपसे पाटलांच्या वतीने 20 फुटी बॅनर आयपीएस अंजना कृष्णा यांच्या समर्थनात लावलेले आहे. या बॅनर वरील मजकूर “वुई सपोर्ट आयपीएस अंजना कृष्णा”, “वुई स्टॅन्ड आयपीएस अंजना कृष्णा” अशी वाक्य बॅनर वर लिहिलेली आहेत आणि अंजना कृष्णा बरोबर खूपसे पाटील यांचा फोटो पण या बॅनरवर आहे.

यावेळी बोलताना खूपसे पाटील म्हणाले, ज्यांच्या नावात मारुतीरायाच्या मातेचे नाव “अंजना” तर आडनावात “कृष्णा“ साक्षात भगवान श्रीकृष्णाचे नाव तर ‘IPS अंजना कृष्णा’ ह्या कशा चुकीच्या असू शकतील.

या संदर्भात करमाळा तालुक्यात दिवसभर या बॅनर विषयी चर्चा रंगत असताना हा बॅनर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल झाला. यावेळी याची कुण कुण पोलिसांना लागली आणि पोलिसांनी स्वतःहून हा बॅनर खाली उतरवला.

यावेळी उपस्थित युवक प्रदेशाध्यक्ष गणेश भानवसे, भैया मंगवडे, कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *