करमाळा प्रतिनिधी

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या 2 खेळाडूंची महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी प्रथम क्रमांक मिळवून पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातून 14, 17 ,19 वर्षांखालील मुली व मुलांच्या जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत राजीव गांधी इंडोर स्टेडियम महानगरपालिका हॉल सोलापूर या ठिकाणी 11 सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या. तलवारबाजी स्पर्धेत कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयातील इयत्ता दहावीत शिकत असलेली विद्यार्थिनी ईश्वरी महेश राऊत (ईप्पी) प्रकारामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला व शर्वरी बळीराम गोफणे हिने (फॉईल) प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाल्या. या दोन्ही खेळाडूंनी अतुलनीय कौशल्य, सामंजस्य आणि जिद्दीचे प्रदर्शन करून सर्वत्र प्रशंसा मिळवली.

स्पर्धेदरम्यान सुरुवातीपासूनच जोरदार खेळाची ओळख करून दिली. त्यांनी सलग सामने जिंकत जिल्ह्यात  शक्तिशाली खेळाडूंना आपल्या श्रेष्ठतेची छाप पाडली. त्यांच्या विजयी यात्रेत सोलापुर जिल्यातील पंढरपूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, अक्कलकोट, माळशिरस ,अशा  विविध शाळेमधील  खेळाडूंना पराभूत करण्यात आले.

या ऐतिहासिक यशामागे खेळाडूंच्या कठोर परिश्रमाबरोबरच क्रीडा शिक्षक श्री जितेश कांबळे सर,  ,श्री नागनाथ बोळगे सर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी खेळाडूंमध्ये टीम भावना निर्माण करून त्यांचे सर्वस्वी पाठबळ दिले.

विद्यालयाने विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.  मुख्याध्यापक श्री सुनील जाधव सर, अंकुशखाने सर, श्री भस्मे सर , श्री जगदाळे सर , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी या यशावर खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या यशाने विद्यालयाचे नाव सोलापूर जिल्ह्यात गौरवाने झळकले आहे. संपूर्ण करमाळा तालुक्यातील सर्व पालक  या विजयाने अत्यंत आनंदित आणि अभिमानाने भारावून गेला आहे. खेळाडूंना भविष्यातील सर्व स्पर्धांमध्ये असेच यश मिळवण्यासाठी शुभेच्छा!

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *