करमाळा प्रतिनिधी

या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आणखीन दृढ झाला असुन जर अन्याय झाला असेल असे वाटत असेल तर नक्की त्याविरुध्द दाद मागण्यासाठी गेल पाहिजे.

याबाबतची हकीकत अशी मौजे करमाळा येथे राहणार कांतीलाल उत्तमचंद बलदोटा वय वर्षे ७९ यांची अंजनडोह येथे शेती असुन त्यांनी डिसेंबर २०२२ साली त्यांच्या शेतात मशागत करुन गोविंददास गोपाळदास देवी यांच्याकडुन निमकर या कंपनीचे बियाणे, खत विकत घेऊन पेरणी केली होती. परंतू ते बियाणे सदोष निघाल्यामुळे उगवण झाली परंतु उत्पादन निघाले नाही. या सर्वांसाठी खूप खर्च झाला होता. अनेक हेलपाटे घालून, कष्ट करून फळ न मिळाल्यामुळे त्यांनी दुकानदार, कंपनी, शेती अधिकाऱ्यांकडे यासंबंधी विचारणा केली, पाठपुरावा केला परंतु आपल्या तक्रारीची कोणीही दखल घेत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांची स्व. भालचंद्र पाठक (सर) यांच्या सल्याने सहकार्याने सोलापूर ग्राहक न्याय मंच मध्ये अॅड. अर्चना आर. कुलकर्णी, सोलापूर यांच्या मार्फत ता. २७/०२/२०२३ तक्रार दाखल केली.

अध्यक्ष, सोलापूर ग्राहक न्याय मंच यांनी कंपनी, संबंधीत अधिकारी यांनी दोषी ठरवत त्यांच्यावर रु. तीन लाख नव्वद हजार रुपय इतका दंड ठोठावत मला न्याय दिला त्याबद्दल खुप समाधानी आहे.

याकामी मला स्व. भालचंद्र पाठक (सर) यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच अॅड. अर्चना आर. कुलकर्णी यांनी अॅडव्हान्स न घेता फक्त माझे म्हणणे ऐकुन घेऊन केसचा अभ्यास व लढण्यास तयार झाल्या त्याला यश आले आहे असेही अखेर शेतकरी कांतीलाल उत्तमचंद बलदोटा यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *