करमाळा प्रतिनिधी

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांनी करमाळा येथे नियुक्ती असलेल्या उपविभागीय लिपीक दर्जाच्या कर्मचाऱ्याला कनिष्ठ लिपीक दर्जाच्या कर्मचाऱ्याचे काम देऊन त्याची नियुक्ती अकलूज येथे केल्याने मागील 2 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम उप विभाग करमाळा येथे उपविभागीय लिपीक हे कर्मचारी पद रिक्त आहे त्यामुळे करमाळा तालुक्यातील सामान्य नागरिकांना वारंवार एकाच कामासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा कार्यालयात हेलपाटे

मारण्याची वेळ येत आहे. याबाबत सुयश कर्चे शिवसेना जिल्हाध्यक्ष व्हीजे एन टी/ओबीसी  यांनी कार्यकारी अभियंता अकलूज यांच्याशी संपर्क केला असता अकलूज येथील कार्यालयातील कर्मचारी कमी असून वरिष्ठ कार्यालयाकडून कर्मचारी उपलब्ध झाल्यास संबंधितांना तात्काळ कार्यमुक्त करू असे लेखी आश्वासन दिले. त्यावर सुयश कर्चे शिवसेना जिल्हाध्यक्ष व्हीजे एन टी/ओबीसी यांनी अधीक्षक अभियंता सोलापूर व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून कार्यकारी अभियंता यांना वरिष्ठ लिपीक दर्जाचे दोन कर्मचारी उपलब्ध करून देऊन सुद्धा आज 2 महिने उलटूनही कार्यकारी अभियंता अकलूज हे करमाळा येथील

उपविभागीय लिपीक यांना करमाळा येथे सोडण्यास तयार नाहीत त्यांच्या या मनमानी कारभाराचा निषेध करून जर 01/08/2025 पर्यंत सदर कर्मचारी करमाळा येथे हजर न झाल्यास मी कोणत्याही स्वरूपात करमाळा तालुक्यातील नागरिकांची कुचंबना अजिबात होऊ देणार नाही व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनास  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वेगवान व पारदर्शक शासकीय कामकाजाला केराची टोपली दाखवून मनमानी कारभार करणाऱ्या कार्यकारी अभियंता अकलूज हे सर्वस्वी जबाबदार असतील असे शिवसेना जिल्हाध्यक्ष सुयश कर्चे व्हीजे एन टी/ओबीसी यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष ओबीसी व्हिजेएनटी सुयश करचे, श्रमिक कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, जिल्हा संघटक संतोष वारगड, युवा सेना तालुका अध्यक्ष नवनाथ गुंड, तालुका अध्यक्ष ओबीसी व्हिजेएनटी रमेश लगस, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब तनपुरे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर मुलानी, तालुका उपाध्यक्ष ओबीसी व्हिजेएनटी विलास करचे, तालुका अध्यक्ष शेतकरी सेना कैलास पाखरे,  युवा सेना सचिव माधव सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब थोरात, ठाणे विभाग प्रमुख शिवसेना देवा भाऊ खताळ, तालुका उपाध्यक्ष शेतकरी सेना अभिजीत  शिर्के, बाळासाहेब कारंडे तालुका उपाध्यक्ष, नागेश गुरव करमाळा तालुका शहर, दत्तात्रेय आल्हाट, मिलिंद भोसले आदि शिवसैनिक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *