
करमाळा प्रतिनिधी
श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था संचलित स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यात आली. नागपंचमी निमित्त स्कूल मध्ये विद्यार्थिनींनी फेर धरून तसेच फुगड्या खेळून, झोके खेळून

अतिशय उत्साहात नागपंचमी साजरी केली. तसेच मेहेंदी, नेलपेंट इ.लावून विद्यार्थी सहभागी झाले होते. या नंतर विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. अशा पद्धतीने अतिशय उत्साहात नागपंचमी साजरी करण्यात आली.

यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी नागपंचमी विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिकांनी मेहनत घेतली.
