
करमाळा प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 29 जून 2025 रोजी राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैदवस्ती (देवळाली) तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील मुख्याध्यापिका प्रफुल्लता बाबासाहेब सातपुते यांना मान्यवरांच्या हस्ते ह्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यामध्ये त्यांचे शैक्षणिक कार्य, गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले विविध उपक्रम, वंचितांचे शिक्षण, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न, पालक व विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केलेले उपक्रम, वाचन चळवळ विकसित करण्यासाठी बुके ऐवजी बुक चा वापर, तसेच विधवा महिलांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी संक्रातीला

विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान दिला या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा, तसेच पुस्तक असे आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

