करमाळा प्रतिनिधी

मौजे खडकी येथील नाथपंथीय डवरी गोसावी या समाजाचे इसम हे बहुरुपी हे पारंपारीक वेशभूषेचे व भटकंतीचे काम करुन आपली उपजिविका करीत आहे. बहुरुपी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली एक कला असून बहुरुपींनी महाराजांच्या काळता हेरगिरी (गुप्तहेर) करण्याचे अत्यंत महत्वाचे काम पार पाडलेले आहे.

इ.स. १९६५ पासून मौजे खडकी ता. करमाळा येथे वास्तव्य करणाऱ्या नाथपंथीय डवरी गोसावी समाजाच्या मौजे खडकी येथे त्यांचे मालकीच्या जागा होत्या. सदर समाज हा बहुरुपी व भटकंतीचे काम करुन त्यांचे कुटुंबाची उपजिविका करीत होता. सदर समाजाने त्यांची असणारी जागा गावात शाळा बांधणेसाठी बऱ्याच वर्षांपूर्वी दिलेली होती. त्यामुळे गावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी गायराण मधील जागा सदर समाजास वास्तव्याकरीता व उपजिविकेकरीता दिलेली आहे.

तरी आमच्या खालीलप्रमाणे मागण्या असून त्या मागण्यांवर शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करुन आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात.

नाथपंथील डवरी गोसावी समाजाच्या व बहुरुपी काम करणाऱ्या कलाकारांना महाराष्ट्र बहरुपी ओळखपत्र शासनाकडून देण्यात यावे, त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या जागेचा उतारा देणेत यावा, त्यांचे मुलांना शाळेत प्रवेश घेणेकरीता व इतर कारणांसाठी रेशनकार्ड व जातीचा दाखले अशी शासकीय कामे करणेकामी शासनाकडून शिबीर राबवणेत यावे, मुलभुम समाज कल्याणच्या माध्यमातून त्यांना घरकुल व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यात यावे अशा विविध मागण्याचे पत्र तहसीलदार यांना दलित महासंघाच्या वतीने देण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *