श्री संत ज्ञानेश्वर सेवा इंदौर या पालखीचे मुस्लिम समाजाकडून स्वागत

करमाळा प्रतिनिधी

       श्री संत ज्ञानेश्वर सेवा इंदौर या पालखीचे स्वागत मुस्लिम समाजाच्या वतीने करमाळ्यातील औद्योगिक वसाहतीत माजी आमदार जयवंतराव जगताप,नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी यांनी केले.

महाराष्ट्रातील काही नागरिक व्यापारासाठी मध्यप्रदेशात गेली होती व तेथेच ते स्थायिक झाले परंतु आजही ते पंढरपूर च्या आषाढी एकादशीला यायचे विसरले नाही सदरची दिंडी ही इंदौर वरुन चापडगाव येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी स्थळी येतात व तेथुन पायी चालत करमाळ्यात मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या कडे त्यांचा पहिला मुक्काम असतो त्याठिकाणी तांबोळी बंधु सर्व वारकरी संप्रदायाची जेवणाची व राहण्याची व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे तांबोळी बंधु दुसऱ्या दिवशी सकाळी मार्गस्थ होईपर्यंत यथासांग आदरतिथ्य करून संपूर्ण वारकरी महाराजांना पंढरपूर कडे मार्गस्थ करतात तसेच हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हाजी उस्मान शेठ तांबोळी व हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवत राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी , पोलीस निरीक्षक रनजीत माने, शिवसेना शहराध्यक्ष प्रवीण कटारिया, जिल्हा उपप्रमुख संजय शिंदे, शहर उपाध्यक्ष संतोष गानबोटे, नितीन अण्णा घोलप, सुजित रासकर, रणजीत ढाणे, पांडुरंग जाधव, सुखदेव बनकर, बंडू बनसोडे, पांडुरंग वारे, राजेंद्र घाडगे, गुलाम कुरेशी, दादा मिर्झा, बापू इंदुरे, इनुस मनेरी, जाफर घोडके, तुळशीराम दुधाट, मुक्तार पठाण, पत्रकार जयंत दळवी,बाळासाहेब कटारिया, इंदाज वस्ताद, अफरोज पठाण, वाजिद शेख, असीम बेग, तौफिक शेख, समीर शेख, शाहरुख शेख, अमीन बेग, मुस्ताक शेख, सोहेल शेख,  राजू पठाण, खालील बागवान, अलीम बागवान, अजिक बेग, गोटू घोडके, आफताब पठाण व इतर जय महाराष्ट्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *