
करमाळा प्रतिनिधी
पांडे येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी निधीची मागणी क्रीडा युवकल्याण अल्पसंख्यांक कॅबिनेट मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडे केली आहे.
भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी गेली अनेक वर्षापासून पांडे गावातील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीची समस्या आहे. दफन भूमीसाठी निधी मिळावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले परंतु कोणीही निधी उपलब्ध केलेला नाही. दत्ता मामा भरणे यांना निवेदन देण्यात आले. करमाळा तालुक्यात अनेक गावांमध्ये दफन भूमीच्या समस्या आहेत त्याही गावांमध्ये निधी देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनिल तेली सर, शिवाजी बनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


