
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील दिलमेश्वर या गावात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्याचा सेट व पेन आणि कंपास इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वतः तालुकाध्यक्ष संतोष वारे, शाळा व्यवस्थापन

समितीचे अध्यक्ष शिवाजी मलाव, माजी सरपंच विलास मारकड, सेवानिवृत्त अभियंता शिवाजी राक्षे, बबन मालव, हमीद पठाण व गावातील प्रतिष्ठित लोक बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेची 100% उपस्थिती, गणवेश, विद्यार्थ्याची गुणवत्ता पाहून संतोष वारे यांनी समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे आदर्श पुरस्कार सन्मानित झालेले शिक्षक गोकुळ कोकाटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याचे परिश्रम घेतले.


