करमाळा प्रतिनिधी
सुंदरदास देवराव मोरे वय (६७) यांचे सोमवार दि. 23 जून २०२५ रोजी डॉ.इनामदार हॉस्पीटलमध्ये निधन झाले. हृदयविकाराच्या उपचारासाठी त्यांना अकलूज येथील डॉ. इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली पंरतु शरीर प्रकृतीने साथ न दिल्यामुळे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामसुंदर शॉपिंग सेंटरचे मालक रामहरी मोरे यांचे ते वडिल होते. अत्यंत शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाचे सुंदरदास मोरे यांच्या निधनाने मोरे परिवारावर दुःखाचा मोठा आघात झाला असून मांजरगाव आणि परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुंदरदास मोरे यांच्यावर सोमवार दि. 23 जून रोजी सायंकाळी सात वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थितीत होता तर बुधवार दि. २५ जून रोजी सकाळी सात वाजता सावडण्याच्या विधीच्या वेळी त्यांच्या शेतजमीनीतच रक्षा विसर्जन करून त्याजागी स्मृतीवृक्षाचे रोपण करण्यात आले. सुंदरदास मोरे यांचे धाकटे बंधू मांजरगावचे माजी सरपंच कल्याण मोरे, जगत्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रभाकर मोरे, माजी सरपंच बाळासाहेब मोरे या मोरे परिवारातील पुरोगामी विचार सरणीच्या कुटुबियांनी वृक्षारोपन करून या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श समाजासमोर ठेवला.