
करमाळा प्रतिनिधी
न.प. प्राथमिक मुलांचे शाळा क्र. 2 येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र जायभाय सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी भाषण दिले.

योग दिनानिमित्त शाळेच्या पटांगणात सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने केली. सूर्यनमस्कार करून योगासनाची सुरुवात करण्यात आली प्राणायाम, ताडासन, भुजंगासन, त्रिकोणासन, वज्रासन यासारखी अनेक आसने विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने केली. योग प्रशिक्षक अशोक ढाकणे यांनी योग्य पद्धतीने योग करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर सय्यद यांनी मुलांना केळी वाटप केली. तसेच शिक्षण मंडळाचे शिक्षण मंडळाचे वरिष्ठ लिपिक शिवदास कोकाटे यांनीही योगामध्ये आनंदाने भाग घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रार्थना व धन्यवाद प्रस्ताव देऊन योग दिनाची सांगता झाली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून योगाचा संदेश घेऊन आरोग्यपूर्ण जीवनासाठी वचन दिले.

