करमाळा प्रतिनिधी

आज योग दिन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त करो योग रहा निरोग, सध्या योगासने आणि प्राणायाम शिवाय कुठल्याही व्यक्तीचे जीवन व्यवस्थितपणे तो जगू शकणार नाही यासाठी दरवर्षीप्रमाणे 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. आज या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट चे मुख्याध्यापक काका घाडगे

अर्जुन ढेरे सर व जाधव सर, योग दिनाचे अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी केली व ती विद्यार्थ्याकडून करून घेतली. यामध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा वीटचे शिक्षक एच यु जाधव सर यांनी वेगवेगळे प्राणायाम, वेगवेगळे आसन सूर्यनमस्कार इत्यादी व्यायाम प्रकार मुक्त हालचाली करून घेतल्या, यामध्ये जि.प. केंद्र शाळा वीट येथील सर्व शिक्षक बांधवांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेऊन विद्यार्थ्याकडून सर्व आसन योगासने प्राणायाम मुक्ता हालचाली व व्यायाम प्रकार करून घेतले.

केंद्र शाळेचे शिक्षक जाधव सर यांनी योग प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीरावर चांगले काय काय परिणाम होतात. या संदर्भात अतिशय सखोल विस्तृत माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली व दररोज सूर्यनमस्कार प्राणायाम हे आपल्या घरी दररोज करायचे अशा पद्धतीची विद्यार्थ्यांना आज शपथ देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *