
करमाळा प्रतिनिधी
किल्ला विभाग येथे नवीन गटारी बांधावे असे निवेदन मुख्याधिकारी करमाळा नगर परिषद यांना रहिवाश्यांनी दिले आहे.
निवेदनात असे म्हटले की, किल्ला विभाग करमाळा येथील जुन्या गटारी खराब झाल्या आहेत. पाण्याचा निचरा होत नाही. दुर्गंधी पसरल्यामुळे पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही सर्वजण मुख्याधिकारी व आरोग्य विभागाला निवेदन दिले आहे. गटारीतील घाण काढण्यासाठी येणारा अडथळा दूर करावा व कर्मचारी महिनाभर येत नाहीत, आरोग्य विभागाच्या

कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी आठवड्यातून एकदा पाठवावे. तेथे नवीन गटार बांधण्यात यावी. येथील रहिवाशी रोहिणी यादव, , कविता रोडे, गेहलोत, जयंत दळवी, रवी यादव, नाना शिंदे, अक्षय दळवी, महादेव यादव, नासीर खान, हर्षद मंत्री यांनी निवेदन दिले आहे.
