
करमाळा प्रतिनिधी
मौजे श्रीदेवीचा माळ येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित अभिमान सोरटे यांची महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता संघटना करमाळा तालुका सह संघटक या पदावर नियुक्ती करण्यात आली.
माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष वसेकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी उपस्थित श्रीदेवीचा माळ येथील समस्त गावकरी मंडळी ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सोरटे यावेळी बोलताना म्हणाले की, माहिती अधिकार पदाचा वापर सर्वसामान्य शेतकरी मायबाप जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी करमाळा तालुक्यातील गोरगरीब जनता सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या पदाचा मी नक्कीच वापर करणार व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार.
