
करमाळा प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था करमाळा संचलित श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा प्रशालेचा एस एस सी बोर्ड चा एकूण निकाल 92.95% लागला असून प्रथम क्रमांक श्रूष्टी जाधव ९३.00%, द्वितीय क्रमांक साक्षी भुजबळ ८७.४०%, तृतीय क्रमांक तेजस्विनी जाधव ८३.00%, चतुर्थ क्रमांक नम्रता कुंभार ८०.६०%, पंचम क्रमांक सोनाली हाके ८०.०% यांनी क्रमांक

पटकावले आहे. सर्व यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक सर्व संचालक मंडळ स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था करमाळा तसेच मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा यांच्या वतीने करण्यात आले.
