
करमाळा प्रतिनिधी
श्री गिरधरदास देवी विद्यालय करमाळा इयत्ता दहावी(SSC) बोर्ड परीक्षा मार्च 2025 मध्ये घवघवीत यश मिळवले आहे. विद्यालयामध्ये समृद्धी विक्रम साळवे हिने 94.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक अडसूळ समृद्धी संतोष 93.20% व तृतीय क्रमांक सुप्रिया भागवत बरडे 92%, चतुर्थ क्रमांक इरकर सोमनाथ बबनराव 87.40% तर पवार

प्रमिला गोरख हिने 85.80% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला. विद्यालयाचा एकूण निकाल 93.2% लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालाल गिरधरदास देवी, संस्थेचे सचिव अमोद दीपचंद संचेती, संचालिका सुनीता कन्हैयालाल देवी, संचालक चंद्रकांत देवी, विजयकुमार रमणलालजी दोशी, मुख्याध्यापक संभाजी मनोहर जगताप सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.
