करमाळा प्रतिनिधी

सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून जातीय जनगणना तसेच ओबीसी राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी सुरू असलेल्या आपल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. प्रथम केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्यासाठी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याबद्दल तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना सन २०२२ पूर्वी लागू असलेले २७ टक्के राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याचे आणि राज्यात पुढील ४ महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकल ओबीसी समाज माढा तालुका यांचे वतीने मनापासून आभार.! तसेच यासंदर्भात आपल्याला सहकार्य करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचे देखील मनापासून आभार यावेळी उपस्थित ओबीसी समाजाचे नेते सुधीर भाऊ गाडेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

राज्यात सन २०२२ नंतर ओबीसी आरक्षणासंदर्भात नेमण्यात आलेल्या बांठिया कमिशनने योग्यरित्या अहवाल गोळा न केल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले होते. या विरोधात ओबीसी समाज संघटना यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच याबाबत आंदोलने, निवेदने, पाठपुरवठा करण्यात आला होता. आपल्या या लढ्याला यश प्राप्त झाले असून केंद्र शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीय जनगणना व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने सन २०२२ च्या पूर्वी असलेले ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेऊन निवडणुका घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या राजकीय अस्तित्वासाठी हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे.

गेल्या आठवडाभरात ओबीसींच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे दोन निर्णय झाले आहेत. त्यामुळे अधिक आनंद झाला आहे. केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय, तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेला आजचा निर्णय हे ओबीसींच्या अस्तित्वासाठी अतिशय महत्वाचे आहेत.

कुर्डूवाडी शहरातील गांधी चौकात फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सुधीर भाऊ गाडेकर, सूर्यकांत दादा गोरे,सोमनाथ देवकते,हंबीरराव गोरे,राज ढेरे, पांडुरंग सुतार,नितीन गोरे, नागेश मेहेर, सागर गोरे,अभिजीत सोलंकर, अतुल राऊत,बाबासाहेब गोरे ,मोहन पुरभे, आकाश गोरे,मिलन कावरे,राजकुमार तरगे,धनाजी माने, आशा घाडगे, स्वाती गोरे, उषा गोरे, रतन गोरे यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *