करमाळा प्रतिनिधी

पुणे विभागातून मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागीय बोर्डातून पायल बापू ओहोळ या विद्यार्थिनीने मराठी विषयात 98 गुण घेऊन सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. महात्मा गांधी जुनियर कॉलेज करमाळा. ता. करमाळा. जि. सोलापूर या कॉलेजची ही विद्यार्थिनी असून प्रा.विजयकुमार पवार हे या विद्यार्थिनीचे मार्गदर्शक आहेत.

पायल ही अत्यंत गरीब परिस्थितीतून शिकत आहे. दररोज 25 किलोमीटर एस.टीने प्रवास करून तिने हे यश संपादन केले आहे. तिचे वडील बांधकाम मजूर म्हणून काम करतात.

पायलचे, तिला मार्गदर्शक म्हणून कार्यरत असणारे प्रा. विजयकुमार पवार आणि तिच्या पालकांचे कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन.

अध्यक्ष – प्रा. सुनील डिसले (बारामती), कार्याध्यक्ष – संपत गर्जे (पुणे), कार्याध्यक्षा- डॉ. मनीषा रिठे (वर्धा), सचिव – प्रा. बाळासाहेब माने (मुंबई), सर्व राज्यकार्यकारिणी/ जिल्हा /तालुका प्रतिनिधी, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *