करमाळा प्रतिनिधी

इयत्ता 12 वी वार्षिक निकाल जाहीर झाला. करमाळा येथील महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स इयत्ता 12 वीचा 100 % निकाल लागला आहे. प्रथम तीन क्रमांक पाटील मोनिका संतोष 88.83 % प्रथम क्रमांक, झोळे धनश्री विजय 81.67 % द्वितीय क्रमांक, ओहोळ पायल बापू 81.00 % तृतीय क्रमांक याप्रकारे तीन क्रमांक आलेले आहेत.

यापैकी पायल बापू ओहोळ ही पुणे बोर्ड मध्ये मराठी विषयांमध्ये 98 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अधिकृत रित्या तिचे नाव जाहीर झाले आहे.

या तिन्ही विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,  करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष जयवंतराव जगताप, विश्वस्त वैभवराजे जगताप, विश्वस्त शंभूराजे जगताप  प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. प्रा.विजयकुमार पवार सरांचे मागर्दर्शन लागले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *