
करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण ता. करमाळा येथील रेवन्नाथ मोरे यांना पाटोदा जिल्हा अहिल्यानगर येथील भक्ती शक्ती प्रतिष्ठानचा प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पाटोदा तालुका जामखेड जिल्हा बीड येथील भक्ती शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते यामध्ये यावर्षीचा वारकरी भूषण, सेवारत्न पुरस्कार आदर्श शेतकरी पुरस्कार शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या हस्ते महाराष्ट्र मंदीर महासंघाचे डॉ. दत्तात्रय चोरघे महाराज प्रसिद्ध किर्तनकार विठ्ठल पाटील महाराज यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. करमाळा तालुक्यातील चिखलठाण नंबर

दोन येथील रेवन्नाथ मोरे यांनी आपल्या शेतीमध्ये विविध पिकांमध्ये घेतलेले भरगोस उत्पादन व शेतीमध्ये केलेले वेगवेगळे प्रयोग याची दखल घेऊन त्यांना प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुणे येथील सर्वेश प्रतिष्ठानचे ज्ञानेश ताटे, डॉ. प्रविण कासार, भारत चव्हाण, अंबादास भोगाडे, रविंद्र खोत, कल्लापा कुटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळींकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.