
करमाळा प्रतिनिधी
किशोर शिंदे हा लढवय्या योध्दा धनगर आरक्षण ते मेंढपाळाच्या विविध मागण्यासाठी फडणवीस सरकारला सद्बुद्धी मिळण्यासाठी त्याच्या जन्मगावी खांबेवाडी ता.करमाळा येथून बिरोबा ट्रस्ट आरेवाडी च्या दिशेने रखरखत्या ऊन्हाचे चटके सोसत पायी चालत चालला आहे. आहो फडणवीस ! ‘क्या हुआ तेरा वादा ! पहिल्या कॅबिनेट मधील आरक्षण कुठंय ? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचे काय झाले ? प्रत्येक जिल्ह्यात १० हजार घरकुलांचे काय झाले ? कुठंय

धनगर समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले १००० कोटी ? कुठंय मेंढपाळांना संरक्षण ? समाजातील विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण, होस्टेल, स्पर्धा परीक्षा कुठंय ? मेंढपाळांना राखीव चाराऊ जंगल कुठंय ? मेंढपाळांनचे चराई अनुदान कुठंय ? आदिवासी विकास संयम योजनेच्या धर्तीवर धनगर समाजाला मिळणाऱ्या योजनेचा लाभाचे काय झाले ? विविध योजनेचे आश्वासन फडणवीस तुम्ही सत्तेत असताना समाजाला दिलें परंतु आज तागायत या आश्वासन पैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही.म्हणूच धनगर समाजातील सुरक्षित युवक धनगर समाजाला न्याय मिळऊन देण्याच्या उद्देशाने करमाळा तालुक्यातील धनगर समाजातील योध्दा किशोर शिंदे हा इसम कडक उन्हात पायी चालत चालला आहे. आत्तातरी या फडणवीस सरकारला सद्बुद्धी मिळावी हीच बिरोबा चरणी प्रार्थना… वाचा आणि पुढे पाटवा..
आपलाच बांधव – अंगद देवकते करमाळा..