करमाळा प्रतिनिधी

स्वामी आनंदयोगी महाराज हे स्वतः उच्चशिक्षित होते, त्यांच्या नावाने वाचनालय निर्माण होणे प्रेरणादायी असल्याचे मत करमाळा तालूक्याचे सर्वात लोकप्रिय युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले. सौंदे ता. करमाळा येथील विकासकाम भुमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. आमदार नारायण आबा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून सौंदे ता. करमाळा येथे सार्वजनिक वाचनालयाच्या बांधकामाचे भुमिपुजन पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आमदार

पाटील यांनी दहा लक्ष रुपये निधी दिला आहे. या वाचनालयास ग्राहस्थांनी दिवंगत स्वामी आनंदयोगी महाराज यांचे नाव देण्याचे निश्चित केले. यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, स्वामी आनंदयोगी महाराज हे नेहमी आमच्या पाटील कुटूंबाच्या श्रध्दास्थानी राहीले. आनंदयोगी महाराज यांनी स्वामी विवेकानंद व स्वामी परमहंस यांच्या विचारांचा अभ्यास करुन यावर पी.एच.डी केली होती. आज अशा अभ्यासू साधूंच्या नावाने जर सौंदे ग्रामस्थ सार्वजनिक वाचनालय निर्माण करत

असतील तर ही बाब येणाऱ्या कित्येक पीढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या गावातील व सौंदे पंचक्रोशीतील सुशिक्षित विद्यार्थ्यांना या वाचनालयात लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा पासुन ते विविध शासकीय भरतीसाठी उपयोगी पडणारे साहित्य ज्ञान रुपात उपलब्ध असावे. हे वाचनालय आधुनिक सुविधांनी युक्त असे ज्ञानाचे भांडार म्हणून ओळखले जावे यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांच्या निधीतुन जी काही मदत असेल ती केली जाईल असे आश्वासन पृथ्वीराज पाटील यांनी ग्रामस्थांना दिले. तर प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना युवानेते पृथ्वीराज पाटील हे नेहमीच युवकाच्या प्रश्नासाठी झटत असतात. युवकांच्या शिक्षण, दळणवळण व्यवस्था, महाविद्यालयीन प्रवेश, रोजगार यासाठी पृथ्वीराज पाटील हे दक्ष राहून लक्ष देत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *