करमाळा प्रतिनिधी

सर फाऊंडेशन स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिचर्स फाऊंडेशन, सोलापूर यांच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय ‘नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2025 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदर येथील विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय आदर्श शिक्षिका रत्नमाला दत्तात्रय होरणे यांना जाहिर झाला आहे. स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन ही संस्था देशस्तरावरील प्रयोगशील आणि कृतीशील शिक्षकांचा सन्मान करते. रत्नमाला होरणे यांना त्यांनी विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी राबविलेले

नाविन्यपूर्ण शैक्षणिक व भावनिक उपक्रम,विविध सामाजिक उपक्रम विविध विषयावर शैक्षणिक व सामाजिक लेख कविता प्रसिध्द, विविध विषयावरील शैक्षणिक व सामाजिक लेख, काव्यालेखणीतून सामाजिक उत्कृष्ट प्रबोधन शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती या उल्लेखनीय कार्याबद्दल नारीशक्ती सन्मान पुरस्कार यासाठी त्यांची निवड करण्यात आली.पुरस्कार निवड झाल्यामुळे त्यांचे कंदर पंचक्रोशीतील, सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच शाळा व्य. समिती अध्यक्ष इब्राहिम मुलाणी, उपाध्यक्ष स्वाती सुरवसे व सर्व सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका चिंतामण मॅडम व सर्व शिक्षकवृंद शाळा कंदर, कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख दे‌वकर व करमाळा तालूक्यातील सर्व शिक्ष‌क,शिक्षिका, गट शिक्षणाधिकारी नलवडे यांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *