करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील पिंपळवाडी येथील श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त उद्या मंगळवार दिनांक 29/04/2025 रोजी सायंकाळी 8 ते 10 या वेळेत ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे आळसुंदे ता. कर्जत यांचे कीर्तन होणार आहे.

झी टॉकीज, युट्युब, फेसबुक द्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे घराघरात पोहोचले आहेत. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, शिव शंभू-चरित्र, भागवताच्या विचारांबरोबरच कीर्तनामध्ये बोलता बोलता यमक जुळवण्याची अनोखी शैली, मार्मिक विनोद, सामाजिक व आध्यात्मिक तत्वांचा मिलाप घडवून कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्मा बरोबर समाज प्रबोधनाचे मोठे कार्य महाराज करत असतात. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासह हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्ष संगोपन, आधी युवा पिढीला मार्गदर्शक विचार महाराजांच्या कीर्तनातून मांडले जातात.

काळ भैरवनाथ यात्रा उत्सव समितीच्या वतीने पिंपळवाडी येथील पवार वस्ती वर होणाऱ्या या प्रबोधन पर कीर्तनाच्या श्रवणाचा लाभ तालुक्यातील भाविकांनी घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *