आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी करमाळा बंद
करमाळा प्रतिनिधी
पहलगाम काश्मीर येथे जो आतंकवादी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ व शहिद देश वासियांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी यशपाल कांबळे यांच्या तर्फे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा बंदची हाक देण्यात आलेली आहे त्यास मराठा सेवा संघ करमाळा व सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी उद्याच्या होणाऱ्या बंदला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे
पाठिंब्याची निवेदन वंचित बहुजन आघाडीचे नेते यशपाल कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले
श्रद्धांजली रॅली सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 सकाळी 9 वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. व सुभाष चौक येथे श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल असे आवाहन यशपाल कांबळे यांनी केले