करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगरपरिषदेचे श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तद्वार वाचनालय येथे जागतिक ग्रंथ दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी ग्रंथालयशास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन निवडक ग्रंथांना पुष्पहार व फुले वाहून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी धनंजय कविटकर, बापू खारगे, विक्रम कांबळे, संजय जगताप, भास्कर पवार, विश्वास पाटील, प्रदिप चौकटे, सरडे सर, शहाजी सरडे, सोमनाथ सरवदे, प्रविण गायकवाड इत्यादी मान्यवरांह वाचकवर्ग, वाचक सभासद, कर्मचारी वृंद व इतर बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

यावेळी दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी 30 व्या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून वाचनालयामध्ये नवनाथ लोंढे सामाजिक कार्यकर्ते यांचे पुस्तकाने मला काय दिले ? या विषयावर व्याख्यान देताना ते म्हणाले की, कसदार वाचनामुळे वाचकाचे व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी लाख मोलाची मदत होते, पुस्तकांनी मला ज्ञान, मानसन्मान, पुरस्कार भरपूर मिळवून दिले. वाचनामुळे माझे जीवन सुखी व समृध्दी झाले. मी जास्त वाचन केले नाही, पण जे मोजके वाचले त्याने माझ्या

जीवनात कलाटणी मिळून मी उत्कृष्ट वक्ता झालो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मी वक्ता म्हणून गेली 29 वर्षे कार्यरत आहे. याचे श्रेय वाचनाला जाते. तसेच आचार्य आत्रे, वि. स. खांडेकर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, भारतीय संविधान, महात्मा फुले, संत गाडगे बाबा इत्यादी नामवंतांचे कसदार साहित्य वाचून नवी दिशा मिळाली. तद्नंतर प्रेरणादायी कविता सादर करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक स्वाती माने यांनी केले तर प्रस्ताविक धनंजय कविटकर यांनी केले तर आभार वाचनालायचे प्रदिप चौकटे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *