करमाळा प्रतिनिधी

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक मध्ये डॉ. हरिदास केवारे यांची डबल हॅट्रिक झाली आहे. सिन्यारिटी नुसार व सहकारातील दांडगा अनुभवानुसार त्यांना आदिनाथचे चेअरमन किंवा व्हा. चेअरमन करावे अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी केली आहे.

श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या सहकारी संस्था प्रतिनिधी गटातून आमदार नारायण पाटील गटाकडून उभे असलेले डॉ. हरिदास केवारे यांची सहाव्यांदा संचालक मंडळावर निवड झाली आहे. सहाव्यांदा निवडून गेलेले डॉ. केवारे आदिनाथमध्ये पहिलेच संचालक ठरले आहेत. ज्येष्ठ संचालक आहेत. त्यांचा सहकारातील दांडगा अनुभव आहे. याचा फायदा आदिनाथ चालू करण्यासाठी होईल. कारखाना गेले कित्येक वर्षे बंद आहे, अनेक अडचणींवर मात करण्यासाठी डाँ. केवारे यांना आदिनाथचे चेअरमनपदी किंवा व्हा. चेअरमनपदी नेमणूक करावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी सभासदां मधुन होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *