आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून आणखी चार एस टी बस करमाळा आगारात दाखल होणार

करमाळा प्रतिनिधी

आमदार नारायण आबा पाटील यांनी नामदार प्रताप सरनाईक यांचेकडे करमाळा आगारासाठी एकुण वीस नवीन एस टी बसेस मागितल्या होत्या. पहिल्या टप्प्यात पाच नवीन बस मिळाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात चार नवीन एस टी बस करमाळा आगारासाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून उद्या सकाळी या गाड्या करमाळा आगारात दाखल होतील. यामुळे आता करमाळा तालुक्यातील दळणवळण प्रश्न बऱ्यापैकी सुटला जाऊ शकेल. उर्वरित नवीस एस टी बसेस सुध्दा येत्या काही महिन्यात करमाळा आगारासाठी उपलब्ध होतील असा आमदार नारायण आबा पाटील यांना विश्वास आहे. करमाळा आगारासाठी नवीन चार गाड्या दिल्याने प्रवासी, रुग्ण, वृध्द, महिला व खास करुन शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा प्रवासाचा प्रश्न सुटला जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या व विविध शैक्षणिक संस्था तसेच व्यापारी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *