करमाळा प्रतिनिधी

बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करणे. दिव्यांग बांधव यांना ६०००/- रूपये मासिक मानधन देण्यासाठी दिनांक ११/०४/२०२५ रोजी रात्री ९.०० वाजता आमदार यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्याचे सांगण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार यांनी  त्या त्या पक्षाची निवडणुक जाहिरनाम्याव्दारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते. आम्ही निवडुण आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे. महाराष्ट्रात दिवसाला ७ शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्या नुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिध्द झालेले आहे. अशी परिस्थिती असतांना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत. अशी जनतेला साद घालुन निवडुण आलेले आमदार कर्ज माफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही. अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भुमिका घेत नाही. यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवय्या व्यक्तीचा महाराष्ट्र आहे.

एप्रिल महिन्यामध्ये ११ एप्रिल ही शेतकऱ्याचा आसुड लिहिणारे शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करुन देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दूपट्टा व छत्रपतींचे नाव घेवुन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असतांना त्याच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज गळ्यात निळा दुपट्टा व पेटती मशाल घेवुन आम्ही सर्व कार्यकर्ते बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात करमाळा तालुक्यातील आमदार जेऊर येथिल निवासस्थानी यांच्या घरासमोर आंदोलनासाठी जात असताना पोलीस प्रशासनाचे आचारसंहिता व कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून आमच्या प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला जेऊर येथील बायपास येथे अडवण्यात आले. शेतकऱ्याला कर्जमाफी व हमीभाव मिळाली पाहिजे व दिव्यांग बांधवांना 6000 पेन्शन मिळाली पाहिजे या मागणीच्या घोषणा देत करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस संदीप बनकर यांना आमदार नारायण आबा पाटील करमाळा विधानसभा यांच्या यांच्या नावे निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्या व दिव्यांग बांधवांच्या मागण्याचा आवाज हा करमाळा प्रतिनिधी म्हणून आवाज विधानसभेमध्ये उठवावा असे निवेदन देण्यात आले.

शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करणेबाबत, दिव्यांग बांधव यांना ६००० रूपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत.

तेव्हा आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा व आमच्या रास्त न्याय हक्काच्या मागण्या मंजुर करून सर्व शेतकरी व दिव्यांगा बांधवाना न्याय द्यावा, याकरीता या मशालीचा उजेड आपण विधानसभेपर्यंत न्यावा याकरीता हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी उपस्थित प्रहार करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, सोलापूर जिल्हा सरचिटणीस बापू नेते तळेकर, तालुका उपाध्यक्ष पप्पू ढवळे, अशोक तळेकर, केम ग्रामपंचायत उपसरपंच सागर कुरडे, मधुकर अवघडे पांडुरंग गुटाळ, सागर कारंडे, सोनू कुरडे, बापू गलांडे व अनेक प्रहार कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *