करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगर परिषद समोरील गणपती मंदिराची इमारत केंव्हाही पडेल इमारत धोकादायक झाली आहे. करमाळा शहरातील जुनी नगरपालिका येथी गणपतीचे मंदिर आहे. हा गणपती नवसाला पावणारा आहे. गारेचा गणपती म्हणून याची ओळख आहे. संकष्ट चतुर्थी, गणेश जयंती निमित्त इथे मोठी गर्दी होती. भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येत असतात किल्ला

विभाग मित्र मंडळाच्या वतीने इथे गणेश जयंती दिवशी अन्नदान केले जाते. या इमारतीलाच भेगा पडल्या आहे. ज्या बाजूने भेगा पडल्या आहेत त्या बोळीत किल्ला विभागातील नागरिक ये जा करत असतात तसेच शालेय शिक्षणासाठी क्लासेस साठी येणारे विद्यार्थी हे पण ये जा करत असतात. गणपती मंदिराच्या इमारतीत एवढ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत की,

पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तरी ही इमारत पाडून त्या ठिकाणी मोठे गणेश मंदिर करावे अशी मागणी भावीकातून होत आहे. तरी नगरपालिकेने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी मागणी भाविक भक्त करत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *