
करमाळा प्रतिनिधी
वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने आज सन 2024-25 च्या गावच्या ग्राम निधीतील 15 टक्के मागासवर्गीय निधी मधून मिक्सर वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी ही याच निधीतून ग्रामपंचायतने 15 फॅन वाटप केले होते. गेली तीन वर्षापासून

वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविले जातात. यामध्ये महिलांसाठी होम मिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वंचित घटकांना डस्टबिन वाटप,मागासवर्गीय बांधवांना फॅन, गावातील प्रमुख चौकात सौर ऊर्जेचे दिवे,

ग्रामस्थांना आरओचे स्वच्छ पाणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे तसेच कार्यालयीन साहित्य घेण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून वाशिंबे गावातील मागासवर्गीय कुटुंबांना मिक्सर वाटप करण्यात आले आहे. यावेळी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.