
करमाळा प्रतिनिधी
अखिल भारतीय क्षत्रिय महासभा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे जिल्हाधिकारी यांना दिल्ली येथील काश्मिरी गेट परिसरामधील वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याची विटंबना करण्यात आली याच्या निषेधार्थ शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, देशाची राजधानी दिल्ली येथील काश्मिरी गेट आयएसबीटी या परिसरामध्ये महापुरुष वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा आहे. येथील पुतळ्यास काही असामाजिक प्रवृत्ती कडून पुतळ्यास खंडित केलेले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून या देश विघातक प्रवृत्तीचा आम्ही हिंदू समाज राजपूत समाजाकडून निषेध करीत असून या कृत्यांमध्ये जे जे दोशी आहे. त्यांना तात्काळ शोधून अशा देशद्रोही विचारांच्या प्रवृत्तीला कठोरातील कठोर शासन करावे, या परिसरामध्ये हे स्थळ संरक्षित करावे, सीसीटीव्ही बसावेत, सुरक्षारक्षक नेमावेत, लवकरात लवकर नवीन पुतळा उभा करण्यात यावा.

देशाच्या रक्षणासाठी हजारो वर्षापासून अनेक महापुरुष योध्दे समाज क्रांतिकारक यांनी आपल्या जीवाची परवा न करता भारत मातेच्या रक्षणासाठी प्राण अर्पण केलेले आहेत आणि क्रांतीकारांनी मातृभूमीसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. दिल्ली येथील घटना अत्यंत निंदनीय असून अशा महापुरुषाची विटंबना काही सडलेल्या मानसिकतेतून होत असेल तर ते देशाच्या हिताच्या दृष्टीने घातक आहे अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढले पाहिजे. त्यांचा शोध घेऊन त्यां देशद्रोह्यांना कठोर शासन करावे अन्यथा पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बादलसिंह ठाकुर, नरेंद्रसिंह ठाकुर, रवींद्रसिंह ठाकुर, किसनसिंह राजपूत, प्रमोदसिंह बायस, रणजितसिंह राजपूत, मनोहरसिंह राजपूत, संजयसिंह मंडवाले, विजयसिंह राजपूत, आदीजण उपस्थित होते.