करमाळा प्रतिनिधी

शहरातील शिवाजीनगर भागात हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी यांनी ईप्तार पार्टीचे आयोजन केले होते. अमीरशेठ तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त जगताप व पाटील यांच्या हस्ते हार, शाल श्रीफळ, फेटा घालून सत्कार करण्यात आला होता.

या ईप्तार पार्टी साठी सर्व हिंदू मुस्लिम समाजातील नेते, सामाजिक कार्यकर्तेना आमंत्रित केले होते. यामध्ये प्रामुख्याने करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, जेऊर ग्रामपंचायतचे सरपंच युवा नेते पृथ्वीराज पाटील, नगरसेवक संजय सावंत, शिवसेनेचे संघटक प्रविण कटारिया, माजी उपनगराध्यक्ष कमलाकर वीर, नगरसेवक प्रशांत ढाळे, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी, केमचे उपसरपंच सुलतान शेख, उमरड ग्रामपंचायत चे सदस्य इरफान शेख, माजी नगरसेवक फारुक जमादार, दिगंबर रासकर, आदी जण उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले की,  इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अधिक महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजातील नागरिक एक महीनाभर उपवास करतात. रमजान चे रोजे मानवाला शांतता बंधुभाव संयम व त्यागाची भावना शिकवते. उपवासामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते तीच पध्दत हिंदू धर्मात श्रावण महिन्यात असते असे ते यावेळी म्हणाले.

ईप्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते हाजी अतीक बेग, वाजीद शेख, तौफिक शेख, सोहेल पठाण, असीम बेग, समीर शेख आदी जणांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *