
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात सध्या दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरू असून वरकटणे (कोंढेज तलाव) (नेर्ले तलाव) पांडे (म्हसेवाडी तलाव) हा भाग दहीगाव योजनेच्या लाभक्षेत्राच्या नजीक येतो परंतु सध्याच्या पाण्याचा आवर्तनातून उल्लेख केलेल्या तलावात पाणी सोडले तर आसपासच्या भागाला शेतीसाठी लाभ होऊ शकतो. सध्या वाढत्या उन्हामुळे

शेतातील पिके करपू लागलेली असून सिंचनासाठी परिसरात पाण्याची नितांत आवश्यकता आहे. तरी वरकटने कोंढेज तलाव, म्हसेवाडी तलाव, नेरले तलाव यामध्ये दहिगाव उपसा सिंचन आवर्तनातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली.
