सोलापूर, दि. 05 : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार 10 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीत सभागृह क्र.1 येथे आयोजित करण्यात आली असल्याचे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा प्र.महसूल अपर आयुक्त समिक्षा चंद्राकार यांनी कळविले आहे.

         प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो, असेही प्र.महसूल अपर आयुक्त समिक्षा चंद्राकार यांनी कळविले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *