
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील ताजमहल हॉटेलचे मालक अकबर सय्यद यांच्या मलिक व मैनोद्यिन या दोन्ही मुलांनी रमजान चा पहिला रोजा पूर्ण केला. मलिक दहा वर्षाचा आहे तर मैनोद्यिन नऊ वर्षाचा आहे. दिवसभर अन्नपाण्या वाचून अल्लाह चे स्मरण करीत त्यांनी रमजान पवित्र महिन्याचा पहिला रोजा पूर्ण केला. त्यामुळे मलिक व मैनोद्यिन या दोघांचेही विशेष कौतुक होऊन सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

