
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 2/3/2025 ते 31/03/2025 पर्यंत रमजान महिना असल्याने करमाळा शहरात पाणी पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने करमाळा नगरपालिका चे पाणी पुरवठा विभाग प्रमुख कविटकर यांच्या कडे जमीर सय्यद व राजु नालबंद यांनी या संदर्भात निवेदन दिले आहे.

2 मार्च पासून पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. या काळात मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव आणि भगीणी या उपवास (रोजा) ठेवतात. या साठी पहाटे उठून उपवास ठेवण्यासाठी महिला भगिनींना सर्व व्यवस्था करावी लागते. यासाठी पाण्याची आवश्यकता जास्त असते. या काळात पाणी पुरवठा विस्कळीत झाला तर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी घरातील मंडळींना उपवासाच्या अवस्थेत भटकावे लागते त्यामुळे याचा मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण रमजान महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत चालू ठेवावा आणि करमाळा शहरातील विविध भागांतील असणाऱ्या मशिदीच्या परिसरात व वस्त्या मध्ये गटार साफसफाई व स्वच्छता करून घ्यावे. तसेच 31 मार्च या दिवशी “रमजान ईद” हा सण असुन त्या दिवशी सर्व मुस्लीम समाज बांधव ईदची नमाजपठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ईदगाह मैदान येथे जमतात. त्यापुर्वी ईदगाह मैदान ची साफसफाई करून स्वच्छता करावी अशी आपणास भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
