करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय वैद्यकीय उपचारासाठी आधार ठरत असून वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात 2025 हीरक आरोग्य वर्ष साजरे करून महाराष्ट्रातील कोट्यावधी रुग्णांना मोफत उपचार केले जाणार आहे ही संकल्पना अभिमानास्पद आहे असे मत डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांनी व्यक्त केले.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री शेत्र संगोबा येथे होणाऱ्या यात्रेत लाखो शिवभक्त सहभागी होतात. या यात्रेतच मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल करमाळा च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर दोन दिवस चालणार असून आज तब्बल 2600 रुग्णांची तपासणी करून लाखो रुपयांची औषधे मोफत वाटण्यात आली. या शिबिरात गरुड कॅन्सर हॉस्पिटल  अहमदनगर, गांधी फाउंडेशन कराड येथील नेत्रचिकित्सालय, सुविधा हॉस्पिटल बार्शी, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय करमाळा, जिल्हा वैद्यकीय अधिकारी सोलापूर आदी जवळपास सात नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.

या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी केले. मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे डॉक्टर ओंकार उघडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अल्प दरात सर्व प्रकारची सेवा देणार व सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया अल्प दरात करणार असल्याचा विश्वास दिला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, पुढील काळात करमाळा तालुक्यातील होणाऱ्या प्रत्येक जत्रेमध्ये यात्रा मध्ये अशा प्रकारचे शिबिरांच्या आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करून एकनाथ शिंदे यांची रुक्मिणी सेवा प्रत्येक घराघरात करमाळा तालुक्यात पोहोचणार.

तहसीलदार शिल्पाताई ठोकडे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे osd मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील जनतेला रुग्णसेवा मिळत आहे. मुंबईत राहून सुद्धा ते करमाळा तालुक्यातील जनतेची काळजी करतात ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कराड यांच्यावतीने नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटण्यात आले. ज्यांच्यावर डोळ्याचे शस्त्रक्रिया करण्याचे आहेत त्यांना मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे. लेन्स ही मोफत दिले जाणार आहेत.

या शिबिरासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे, गुळसडी येथील उद्योजक अजिंक्य पाटील, शहर प्रमुख संजय शीलवंत, वैद्यकीय कक्ष प्रमुख दीपक पाटणे, ओबीसी आणि आघाडीचे तालुकाध्यक्ष अंकुशराव जाधव, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण, जेऊर शाखाप्रमुख संजय जगताप, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, आजिनाथ वस्ताद कोळेकर, गंगुबाई शिंदे नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपल सोमनाथ जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे, आदी जण उपस्थित होते.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कमलादेवी ब्लड बँक गंगुबाई शिंदे नर्सिंग कॉलेज, गंगुबाई शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर, या संस्थेचे कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *